आज मला वेगळं वाटतंय
जग सारं सुन्न भासतंय
गजबजलेल्या वर्गात सुद्धा
मला मात्र एकटं वाटतंय
नाही राहिले मित्र
नाही वर्गातली मस्ती
आता फक्त आठवायच्या
गतवर्षीच्या गोष्टी
बदलले आमचे वर्ग
बदलल्या आमुच्या दिशा
आता मात्र फक्त
भविष्यात भेटण्याची आशा
आज आयुष्यात मला सगळं
सोडून द्यावंसं वाटतंय
अभ्यास कॉलेज सोडून
मला दूर जावसं वाटतंय
हरलो म्हणून, पिचलो म्हणून
काहीच फरक पडत नाही
कारण मी उध्वस्त झालो
म्हणून जगाचं काही अडत नाही
म्हणून एक मिनिट थांबायचं
सगळं काही आठवायचंय
दुःख सारं ओकायाचय
मला ढसाढसा रडायचंय!!!
जग सारं सुन्न भासतंय
गजबजलेल्या वर्गात सुद्धा
मला मात्र एकटं वाटतंय
नाही राहिले मित्र
नाही वर्गातली मस्ती
आता फक्त आठवायच्या
गतवर्षीच्या गोष्टी
बदलले आमचे वर्ग
बदलल्या आमुच्या दिशा
आता मात्र फक्त
भविष्यात भेटण्याची आशा
आज आयुष्यात मला सगळं
सोडून द्यावंसं वाटतंय
अभ्यास कॉलेज सोडून
मला दूर जावसं वाटतंय
हरलो म्हणून, पिचलो म्हणून
काहीच फरक पडत नाही
कारण मी उध्वस्त झालो
म्हणून जगाचं काही अडत नाही
म्हणून एक मिनिट थांबायचं
सगळं काही आठवायचंय
दुःख सारं ओकायाचय
मला ढसाढसा रडायचंय!!!